Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या अंजेड्यातून मागील काही दिवसांत महाराष्ट्रात या सर्व घडामोडी झाल्या आहेत. 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप -युती (Shiv Sena - BJP) म्हणून निवडणूक लढवली होती. आम्ही लोकांच्या मनातील सरकार स्थापन केलेय. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छ भेटीला आम्ही दिल्लीमध्ये आलो आहोत. राज्याच्या विकासात केंद्राचा सिंहाचा वाटा असतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राजधानी दिल्लीमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली. 


हे सरकार लोकांच्या हिताचं सरकार आहे. शेतकरी कष्टकरी कामगार आणि सर्वच घटकांना न्याय देणारं सरकार आहे. यासाठी केंद्राचे आशिर्वाद असणेही गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं योगदान आणि व्हिजनही समजून घेणार आहोत. सरकार स्थापन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि खासकरुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशिर्वाद लाभले आहेत. जेपी नड्डा आणि अमित शाह यांचेही आशिर्वाद, सहकार्य लाभले आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 


यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले. ते म्हणाले की, मी खासकरुन उपमुख्यमंत्री आणि पाच वर्ष यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेले देवेंद्र फडणवीस यांचे हे सरकार स्थापन करण्यात मोठं योगदान आहे. आमच्या सरकारचा प्लस पॉईंट देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक मोठे प्रकल्प राबवले आहेत. राज्याला चांगले दिवस मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करु.


मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? अमित शाह यांच्यासोबत याबाबत चर्चा झाली का? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अमित शाह यांच्यासोबत काल झालेली भेट ही सदिच्छ भेट होती. आषाढी वारीनंतर मी आणि देवेंद्र फडणवीस दोघे मंत्रिमंडळाबाबत चर्चा करु. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आमंचं बंड नव्हे, आमची पक्षातील क्रांती आहे. बंड केलेले आमदार पैशांच्य मागे आलेले नाहीत. 50 खोके कसले? मिळाईचे का? पैसे घेतल्याच्या आरापोला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. सभागृहात तोंड दाबून मुक्क्यांचा मार खात होतो. सभागृहात सावरकरांविषयी बोलू शकत नव्हतो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


महाराष्ट्रात घडलेल्या गोष्टीची देशाने नव्हे जगाने दखल घेतली. बहुमताचे स्थिर सरकार राज्याला मिळाले आहे. शिवसेना-भाजप युतीचं सरकार अडीच वर्षापूर्वी व्हायला पाहिजे, ते आम्ही स्थापन केलेय. आम्ही आमचं काम करत राहू, कुणी काही बोललं तरी आमच्यावर काही परिणाम होणार नाही.  महाराष्ट्राचे तुकडे होणार असी कोणताही चर्चा झाली नाही. काही जणांकडून दिशाभूल करण्यासाठी अशी विधानं केली जाते. असे प्रत्युत्तर एकनाथिशिंदे यांनी संजय राऊत यांना दिले. ओबीसी आरक्षणाबाबत तुषार मेहता यांची भेट घेतली. ओबीसी आरक्षणाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.