CM Eknath Shinde Delhi Tour LIVE : शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा, आज पंतप्रधानांसह अनेक दिग्गजांच्या भेटीगाठी; पाहा प्रत्येक अपडेट्स

CM Eknath Shinde Meets PM Modi today: आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत.या दौऱ्याचं सर्व अपडेट्स आपल्याला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून मिळणार आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Jul 2022 03:17 PM
Eknath Shinde : आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करु; एकनाथ शिंदे

आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करु असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. जनतेच्या इच्छेनुसार राज्यात शिवसेना आणि भाजपचे सरकार आल्याचं ते म्हणाले. 

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर, एकनाथ शिंदे म्हणाले...

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर, एकनाथ शिंदे म्हणाले, 'राष्ट्रपती कोविंद, अमित शाह, नड्डा यांची भेट घेतली'

CM Eknath Shinde Delhi Tour LIVE : दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट

दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेतली, कायदेशीर प्रक्रियेबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता 

दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची कायदेशीर दृष्टीने ही हालचाली, थोड्याच वेळात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची घेणार भेट, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस घेणार भेट

दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची कायदेशीर दृष्टीने ही हालचाली, थोड्याच वेळात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची घेणार भेट, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस घेणार भेट

Eknath Shinde Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद, आज दुपारी दोन वाजता दिल्लीतून संवाद साधणार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद, आज दुपारी दोन वाजता दिल्लीतून संवाद साधणार 

CM Eknath Shinde Delhi Tour LIVE : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली

CM Eknath Shinde Delhi Tour LIVE : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली

CM Eknath Shinde Delhi Tour LIVE : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे एकत्र राजनाथ सिंग यांच्याकडे रवाना

CM Eknath Shinde Delhi Tour LIVE :  एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे एकत्र राजनाथ सिंग यांच्याकडे रवाना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे पी नड्डा यांची भेट घेतली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली,  त्यांना विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेट दिली.



दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सदिच्छा भेट घेतली

दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सदिच्छा भेट घेतली..आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी झालेल्या ह्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना विठोबा रखुमाईची मूर्ती भेट म्हणून दिली.

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या घरी पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या घरी पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वेळेआधीच अर्धा तास शिंदे आले, भाजप अध्यक्ष यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत भविष्यातील शिंदे गट आणि भाजपच्या युती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता. तसेच ही एक सदिच्छा भेट देखील सांगितली जात आहे, यानंतर राजनाथ सिंग यांच्या घरी जाणार एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती कोविंद यांची भेट, विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती कोविंद यांची भेट, विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार


मुख्यमंत्र्यांचे  महापुरुषांना अभिवादन

मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे  यांनी आज  महाराष्ट्र सदनाच्या परिसरात स्थित महापुरुषांच्या पुतळयांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसांच्या  दिल्ली दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी महाराष्ट्र सदनाच्या  दर्शनीभागात स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या  प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त डॉ निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ, राजेश अडपावार यावेळी उपस्थित होते.  सदनातील मुख्यमंत्री दालनाच्या शेजारी स्थित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच राज्यपालांच्या दालनाशेजारी स्थित क्रांतीज्योती महात्मा  फुले यांच्या प्रतिमेसही मुख्यमंत्र्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

काही वेळात मुख्यमंत्री शिंदे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. तर दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज सकाळी महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुख्यमंत्री आजच्या कार्यक्रमांना सुरुवात केली. काही वेळात मुख्यमंत्री शिंदे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. तर दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज सकाळी महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुख्यमंत्री आजच्या कार्यक्रमांना सुरुवात करत आहेत. काही वेळात मुख्यमंत्री शिंदे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. तर दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

आज शिंदे आणि फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार

महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत दाखल झाले... काल दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बैठक घेतली. रात्री नऊच्या सुमारास सुरु झालेली बैठक मध्यरात्री दोनपर्यंत सुरु होती..विशेष म्हणजे शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारनं शाहांना भेटण्यासाठी पोहोचले. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाल्याचं बोललं जातंय. आज शिंदे आणि फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. तसंच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू,  केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.. 

कसा असणार आहे एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम

साडेनऊ वाजता महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवराय, बाबासाहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन


सकाळी दहा वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट


त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट


दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषदेची शक्यता


साडेचार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा पहिलाच दिल्ली दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.

अमित शाह यांच्याकडून शुभेच्छा , भेटीचे फोटो ट्वीट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) यांची भेट घेतली. यावेळी अमित शाह यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांनी या भेटीचे फोटो ट्वीट केले आहेत. ट्वीट करत शाह यांनी म्हटलं आहे की, 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. दोघांनाही शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करतील आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास आहे'.

आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार

आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच कायदेशीर लढ्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठकीत देखील या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली

दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रात्री नऊच्या सुमारास सुरु झालेली बैठक मध्यरात्री दोनपर्यंत सुरु होती. विशेष म्हणजे शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारनं शाहांना भेटण्यासाठी पोहोचले. आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच कायदेशीर लढ्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठकीत देखील या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत दाखल

CM Eknath Shinde Meets PM Modi today: महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काल दिल्लीत दाखल झाले. काल दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रात्री नऊच्या सुमारास सुरु झालेली बैठक मध्यरात्री दोनपर्यंत सुरु होती. विशेष म्हणजे शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारनं शाहांना भेटण्यासाठी पोहोचले. आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच कायदेशीर लढ्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठकीत देखील या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

पार्श्वभूमी

CM Eknath Shinde Meets PM Modi today: महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काल दिल्लीत दाखल झाले. काल दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रात्री नऊच्या सुमारास सुरु झालेली बैठक मध्यरात्री दोनपर्यंत सुरु होती. विशेष म्हणजे शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारनं शाहांना भेटण्यासाठी पोहोचले. आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच कायदेशीर लढ्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठकीत देखील या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आजच्या या दौऱ्याचं वार्तांकन करण्यासाठी एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम आणि अक्षय भाटकर हे दिल्लीमध्ये आहेत. या दौऱ्याचं सर्व अपडेट्स आपल्याला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून मिळणार आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) यांची भेट घेतली. यावेळी अमित शाह यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांनी या भेटीचे फोटो ट्वीट केले आहेत. ट्वीट करत शाह यांनी म्हटलं आहे की, 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. दोघांनाही शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पूर्ण निष्ठेने जनतेची सेवा करतील आणि महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास आहे'.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासून दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.


मुख्यमंत्री दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान मोदी यांच्यासह देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील. पुण्याहून मुख्यमंत्री पंढरपूरला जाणार आहेत. तिथे उद्या आषाढी एकादशीनिमित्त त्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त विठ्ठलाची पूजा होईल.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीतून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर पोहचतील असं सांगण्यात आलं आहे.  पुणे विमानतळावरून ते आषाढी एकादशीनिमित्त करण्यात येणाऱ्या शासकीय पुजेसाठी पंढरपूरला रवाना होतील. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.