Government Employees Strike  : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी ( Government employees)  23 आणि 24 फेब्रुवारीला  संपाची  हाक दिली आहे.  मुख्यमंत्री ठाकरे (cm uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Paear) कर्मचाऱ्यांनी पत्र लिहिले आहे. निवृत्तीचं वय 60 वर्षे करावं आणि जुनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.  आता कोरोनाचं संकट कमी होत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून रखडलेल्या मागण्या मार्गी लावाव्यात या मागणीसाठी हा संप करण्यात येणार आहे. 


यासंबधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की,  राज्यात 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्वांन जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच अशा कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर नवीन पेन्शन योजनेतील सर्व सुविधा लगू कराव्यात  अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या अगोदरही महासंघाच्या वतीने पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करण्यात आला आहे. 


काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?



  • राज्यातील अडीच लाखांहून अधिक असलेली रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने न भरता नियमित वेतनश्रेण्यांवर भरावीत

  • पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटीसंदर्भातील खंड- 2 अहवालाची अंमलबजावणी करावी

  • केंद्र आणि अन्य 25 राज्यांप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे

  • सातव्या वेतन आयोग थकबाकीच्या तिसऱ्या हप्ता तातडीने मिळावा

  • सातव्या आयोगानुसार केंद्रात लागू केलेले वाहतूक आणि अतर भत्ते राज्यातही लागू व्हावेत

  • विविध खात्यांतीस रखडलेल्या बढती प्रक्रिया विनाविलंब कराव्यात

  • महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात

  • सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील ग्रेड पे ची सातव्या वेतन आयोगांतर्गत एस -20 मर्यादा काढाली


सार्वजनिक बँकाच्या खासगीकरणाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात देशभरातील  बँक कर्मचारी देखील  23 आणि 24 फेब्रुवारीला संपावर जाणार आहे. 


संबंधित बातम्या :


Bank Union Strike: खासगीकरणाविरोधात बँका दोन दिवसांच्या संपावर; 'या' दोन दिवशी व्यवहार होणार ठप्प