Maharashtra Din 2023 Live Updates : महाराष्ट्र दिनाला विदर्भवाद्यांचा विरोध
Maharashtra Din 2023 Live Updates : आज महाराष्ट्र दिन (Maharashtra Din 2023) आहे. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.
Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी
विदर्भात आज वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा अंदाज
मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता
मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा
मुंबई, ठाण्यात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज
राज्यात 5 मे नंतर अवकाळी पाऊस कमी होणार
Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथील पोलीस कवायत मैदानावरील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल व इतर अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बार्शीच्या सुलाखे हायस्कूल मध्ये महाराष्ट्र दिनानिमीत्त ध्वजारोहण चा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सुलाखे हायस्कूल बार्शी च्या शतकीय वर्षाचा पाहिला अंक,
शाळेचे/संस्थेचे मुखपत्र 'संवाद' चे विमोचन करण्यात आले.
Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिनी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं आंदोलन करत काळे कपडे परिधान करुन विदर्भ चण्डिका मंदिरात आरती करून निषेध नोंदवण्यात आला. वेगळे विदर्भ राज्य झालाच पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही अशी मागणी करत आजच्या दिवशी निषेध नोंदवण्यात आलाय. विदर्भ राज्य निर्मितीसाठीचा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आज उमरेड कोळशाच्या खाणीवर आंदोलनचा नारा दिलाय. महाराष्ट्रात राहून विदर्भाची दुर्दशा झाली आहे.
बार्शीच्या सुलाखे हायस्कूल मध्ये महाराष्ट्र दिनानिमीत्त ध्वजारोहण चा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सुलाखे हायस्कूल बार्शी च्या शतकीय वर्षाचा पाहिला अंक,
शाळेचे/संस्थेचे मुखपत्र 'संवाद' चे विमोचन हस्ते करण्यात आले.
Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून सिंधुदुर्गच्या कणकवली मधील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी स्टोन आर्ट बनवलं आहे. दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता त्या दगडावर रंगाची उधळण करीत चित्र साकारली आहेत. महाराष्ट्राचा नकाशा बनवून त्यावर वेगवेगळी चित्र साकारलेली आहे. चित्र त्या नकाशावर घेऊन महाराष्ट्राचं सास्कृतिक आणि राजकीय नेत्यांची स्टोन आर्ट गॅलरी बनवली आहे.
Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिनानिमित्त सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर ओरोस पोलीस परेड मैदानावर विविध पथकांचे संचलन देखील करण्यात आले. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण ध्वजारोहण सभारंभाला उपस्थिती नव्हती.
Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिनाला विदर्भवाद्यांचा विरोध. नागपूरच्या सदर परिसरात विरोध प्रदर्शन करणाऱ्या 10 ते 12 विदर्भावाद्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र दिन हा विदर्भवादी काळा दिवस म्हणून पाळतात.
Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नांदेडमध्ये आज पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस दलांनी पालकमंत्री महाजन यांना सलामी दिली. ध्वजारोहण सोहळ्याला स्थानिक खासदार आणि सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती.
Maharashtra Din 2023 : त्रिविक्रम ढोल ताशा पथक दुबई हे आखाती देशातील पहिले एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक आहे. दरवर्षी साधारण 25 ते 30 वादन करणारे हे पथक, आपल्या सादरीकरणातून नेहमीच महाराष्ट्राची कला व संस्कृतीचे उत्तम प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर जगासमोर मांडत आले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त पथकाचे संथापक सागर पाटील यांनी चक्क एक लक्झरी बोटवर, पर्शियन गल्फ या समुद्रात, जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल 'बुर्ज अल अरब' याच्यासमोर, पाण्यात ढोल ताशाचे वादन केले. ही धाडसी कल्पना आखताना सागर पाटील म्हणतात, महाराष्ट्राची कला व संस्कृती परदेशात राहुन जपण्याचे व त्याचा प्रचार करण्याचे काम आम्ही गेली पाच वर्ष करतच आहोत पण यावर्षी काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने ही संकल्पना आखली. या वादनासाठी पथकातील 20 वादकांनी सहभाग घेतला व यात महिलांचाही समावेश होता. ही योट दुबई मरीना येथून वादकांना घेऊन निघाली आणि वाटेत Dubai Eye Giant Wheel समोरून वादन करीत बुर्ज अल अरब या हॉटेलच्या समोर पाण्यात थांबली व या ठिकाणी ढोल ताशाचे वादन करून या पथकाने परतीचा प्रवास गाठला.असा हा विक्रम करून दुबईच नव्हे तर जगभरातील सर्व महाराष्ट्रिय जनतेला त्रिविक्रम ढोल तशा पथकाने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्या दिल्या.
Maharashtra Din 2023 : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथील प्रशासकीय भवन येथे ध्वजारोहण केलं. त्यानंतर प्रशासनात चांगली कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.
Maharashtra Din 2023 : आज एक 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे येथील साकेत पोलीस मैदानात जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आलं. यावेळी पोलीस आयुक्त जयजित सिंग देखील उपस्थित होते. ठाणे पोलीस यांच्या वतीनं महाराष्ट्र दिन निमित्त परेड देखील काढण्यात आली.
Maharashtra Din 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मागील नऊ महिन्यात राज्य सरकारनं चांगलं काम केल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना आता विम्यासाठी पैसे भरण्याची गरज नाही. एक रुपयात विमा भरण्याचा निर्णय आपण घेतला आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून शेती शाश्वत झाली पाहिजे याचा प्रयत्न करत आहोत. यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल याचा प्रयत्न करत आहोत. इतिहासील सर्वात मोठी मदत महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना केली आहे. अनेक आन्हान आहेत. अवेळी पाऊस पडत आहे. खरीपात पाऊस पडला नाहीतर नियोजन करावं लागले. जलसंधारणाची काम करावी लागलीत, केंद्र सरकारनं जलसंधारणाच्या बाबतीत राज्याचा पहिला क्रमांक आला, महाराष्ट्र एकमेव राज्य असे आहे की भूजलसंवर्धानाची पातळी वाढली आहे.
येणाऱ्या काळात शेतीचे नुकसान होणार नाही यासाटी सरकार प्रयत्न करत आहे. विविध योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे फडणवीस म्हणाले.
Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
Maharashtra Din : आज नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे महाराष्ट्र दिन सोहळा साजरा होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे परेड संचलन कार्यक्रम आयोजित केलं आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी सहा ते दुपारी 12 या वेळेत शिवाजी पार्क परिसराकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे.
Maharashtra Din : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्यांनी बलिदान दिलं त्या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादनं केलं.
Maharashtra Din : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हुतात्मा चौकात दाखल झाले आहेत. त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं.
पार्श्वभूमी
Maharashtra Din 2023 Live Updates : आज महाराष्ट्र दिन (Maharashtra Din 2023) आहे. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण आजच्या दिवशी केले जाते.
आजच्या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.
महाराष्ट्र दिनाचा इतिहास
21 नोव्हेंबर इ.स.1956 दिवशी फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसं प्रचंड चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाऊंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.
106 आंदोलकांचं हौतात्म्य
स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र, राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुंबई मराठी माणसांपासून तोडली जात असल्याची एक चीड त्यावेळ धुमसत होती. त्यामुळे 21 नोव्हेंबर 1956 रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांनी एक मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पोलिसांना हा मोर्चा आवरणे कठीण झाले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. परंतु,जमाव पांगला नाही. त्यामुळे मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात 106 आंदोलकांना हौतात्म्य आलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -