बारामती : अजित पवार म्हटलं की आपल्याला आठवतं त्यांचं आक्रमक रूप.. करारी आवाज आणि बोलायला फटकळ.. परंतु अजित पवार यांचा मृदु स्वभाव समोर आलाय.. अजित पवारांच्या व्यस्त कार्यक्रमात अजित पवारांना जालिंदरची तब्बेत बिघडली आहे असा फोन आला. अजित पवारांनी लागलीच बारामतीतील बारामती हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि काहीही करा पण जालिंदरला वाचवा अशी विनंती डॉक्टरांना केली.. जालिंदर कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.. जालिंदर शेंडगे हा अजित पवारांच्या घरातील नोकर आहे.


जालिंदर शेंडगे हे अजित पवारांच्या लहानपणापासून घरी काम करतात. अजित पवारांच्या व्यस्त कार्यक्रमात त्यांना फोन आला जालिंदर खूप आजारी आहे. अजित पवारांनी लागलीच बारामतीतील बारामती हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि सांगितलं काहीही करा पण जालिंदरला बरा करा.


अजित पवारांना सायकलवरून शाळेत ने आण करायचे
जालिंदर शेंडगे हे अजित पवारांच्या लहानपणापासून सेवेत आहेत. ते अजित पवारांना सायकलवरून शाळेत ने आण करायचे. जालिंदर आजारी असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि अजित पवार अस्वस्थ झाले. याप्रकरणाची माहिती अजित पवारांचे स्वीय सहायक सुनील मुसळे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून दिली आहे. अजित पवारांच्या फोनने आपल्या पतीचा जीव वाचल्याची भावना जालिंदर शेंडगेच्या पत्नीने दिली आहे. सोबतच जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला आहे.






अनेक वेळा लोकांना अजित पवारांच्या करारी स्वभावाचा प्रत्यय आलाय. परंतु अजित पवार हे जेवढेबाहेरून कडक स्वभावाचे आहेत तेवढं ते आतून हळवे असल्याची भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली होती.


जेवढे अजित पवार कार्यकर्ते, पदाधिकारी नोकर वर्गावर चिडतात तेवढेच ते प्रेम देखील करतात. आज काल अजित पवारांची राजकारणाची शैली बदललेली दिसते. अजित पवार आधी बोलायला फटकळ आणि तुसड्या स्वभावाचे होते. परंतु मागच्या काही वर्षांपासून हे हळवे झालेले पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवारांना आलेली ईडीची नोटीस आली तेव्हा भर पत्रकार परिषदेत रडू कोसळले होते. आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या मृदू स्वभावाचा प्रत्यय आला.