नागपूर : दहावी बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण विभागाची डोकेदुखी आता चांगलीच वाढली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांना शाळेच्या इमारती देण्यास शिक्षणसंस्था महामंडळानं नकार दिला आहे. आज नागपूर आणि अमरावती विभागाच्या शिक्षण संस्था संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शाळा परीक्षांसाठी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थी मात्र चिंतेत पडले आहे की नक्की काय होणार?, परीक्षा कुठे द्यायचा असा प्रश्न आता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सतावत आहे.
बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना शाळेच्या इमारती देण्यास शिक्षण संस्था महामंडाळचा नकार कायम आहे. राज्यात 6000 संस्थांच्या 64, 000 शाळा या निर्णयात सामील असल्याचा दावा केला आहे. नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षण संस्था संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत परत एकदा शिकामोर्तब करण्याच आले आङे.
राज्यात सहा हजार संस्था आणि 64 हजार अनुदानित शाळा आहेत. त्यातीस 600 कोटी तीन वर्षांपासून थकीत आहे. तर 2000 कोटी 2003 पासून थकीत आहे. आजच्या बैठकीत न मिळालेले वेतनेत्तर अनुदान तातडीने देण्याची मागणी आज परत या बैठकीत करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लागणारे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्याचे शासनाने म्हटले आहे. मात्र सध्याची विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती पाहता ते आता शक्य नाही त्यालाही महामंडळाने विरोध दर्शविला आहे. अपुरी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या असताना परीक्षा घेण्यासही विरोध आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Maharashtra HSC Time Table 2022 : बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जारी; 4 मार्च रोजी पहिला पेपर, पाहा संपूर्ण Time Table
- Maharashtra HSC SSC Exam : दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी आता साडेतीन तासांचा वेळ
Board Exam : दहावी बारावीच्या परीक्षेसाठी शाळा न देण्याच्या निर्णयावर संस्थाचालक ठाम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha