GST Invoice Racket : जीएसटी भिवंडी आयुक्तालयाकडून 132 कोटींचं रॅकेट उघडकीस आले आहे. यामध्ये 23 कोटी रुपयांचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचं उघड झालं आहे.  या रॅकेटचा मास्टरमाईंड हसमुख पटेल याला अटक करण्यात आली आहे. 


 






मास्टरमाइंडला अटक
मुंबईमधील CGST भिवंडी आयुक्तालयाने 132 कोटी रुपयांचे रॅकेट उघडकीस आणले असून बनावट इनव्हॉइस जारी करणे, तसेच 23 कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेणे अथवा पास करणे अशा बनावट इनव्हॉइस रॅकेटचा पर्दाफाश केला. या सिंडिकेटचा मास्टरमाइंड हसमुख पटेल याला अटक करण्यात आली असून तो 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे.