Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 2 February 2022 : राज्यासह देशातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
दिल्लीत आज 3,028 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4,679 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आसाममध्ये आज 1,028 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5,293 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कर्नाटकात आज 20,505 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 40,903 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तामिळनाडूत आज 14,013 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 24, 576 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 18 हजार 067 नव्या रुग्णांची भर पडली असून 79 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 36 हजार 281 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 2848 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5521 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात गेल्या 24 तासात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 24030 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत आज कोरोनाचे एक हजार 128 रुग्ण आढळले. 1 हजार 838 रूग्णांची कोरोनावर मात. दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 1 हजार 128 रुग्णांपैकी 108 रुग्णांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील 37 हजार 185 बेडपैकी 1 हजार 953 बेड वापरात
BMC कडून आज 46 हजार 073 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली.
मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजार 158 आहे.
केरळात आज 52,199 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 41,715 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 29 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
वाशिम जिल्ह्यात आज 83 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 225 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज दिवसभरात अकोल्यात 122 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 1099 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 14 हजार 372 नव्या रुग्णांची भर पडली असून 94 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 30 हजार 093 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 3221 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1682 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 94 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 94 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.84 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 73 लाख 97 हजार 352 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.63 टक्के आहे. सध्या राज्यात 10 लाख 69 हजार 596 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2731 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 47 लाख 82 हजार 391 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत मंगळवारी 803 नवे कोरोनाबाधित, तर 1 हजार 800 जण कोरोनामुक्त
मुंबईत नव्याने आढळणाऱ्या कोरोना बांधितांच्या संख्येत आता बऱ्यापैकी घट झाली आहे. सोमवारी (31 जानेवारी) एक हजारांखाली गेलेली रुग्णसंख्या आजतर आणखी कमी झाली आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे (Corona) नवे 803 रुग्ण आढळले असून 1 हजार 800 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 8 हजार 888 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -