Coronavirus Update : राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने आटोक्यत आली आहे. मृताच्या संख्येतही मोठी घट पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी फक्त 97 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तब्बल दोन वर्षानंतर राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. याआधी राज्यात एप्रिल 2020 मध्ये कोरोना रुग्णसंख्या शंभरच्या आत होती.


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 97 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर फक्त एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सातारा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मागील 24 तासांत राज्यात 251 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77,23,005 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.10% एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे.


राज्यातील कोरोनामुक्तांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सक्रीय रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या एक हजार 525 इतकी झाली आहे.  राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात 518 सक्रीय रुग्ण आहेत. तर मुंबईत 315, ठाणे 166, अहमदनगरमध्ये 144 सक्रीय रुग्ण आहेत. धुळे, हिंगोली, यवतमाळमध्ये एकही सक्रीय रुग्ण नमाही. तर पालघर 9, रन्नागिरी 4, सांगली 7, जळगाव 4, नंदूरबार1, जालना 1, परभणी 9, नांदेड 9, उस्मनाबाद 6, अमरावती 4, अकोला 3, वाशिवाम 3. वर्धा 1, भंडारा 1 चंगद्रपूर 3 आणि गडचिरोलीमध्ये सात सक्रीय रुग्ण आहेत.


राज्यात शनिवारी नवीन 97 कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,72,300 इतकी झाली आहे. राज्यात आज आढळेल्या कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळले आहेत. मुंबईत आज 29 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. पुणे मनपा (PUne) 12. पिंपरी चिंचवड (Pimpri chinchwad) 13 या तीन ठिकाणी कोरोना रुग्णांनी फक्त दुहेरी आकडा गाठला आहे. ठाणे (Thane), उल्हासनर, भिवंडी (Bhiwandi), निजामपूर मनपा, मीरा भाईंदर मनपा, वसई विरार मनपा, पनवेल मनपा, मालेगाव मनपा, धुळे (Dhule), धुळे मनपा, जळगाव, जळगाव मनपा, नंदूरबार, सोलापूर (Solapur), कोल्हापूर, सांगली(sangli), सांगली मिरज कुपवाड मनपा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये आज एकही रुग्ण आढळलेला नाही.