जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील 25 आमदार आमच्या संपर्कात असून ते अधिवेशनावर देखील बहिष्कार टाकणार होते, पण ते सावरले. अशी प्रतिक्रिया दिली होती. ज्यावर बोलताना आता अब्दुल सत्तार यांनी भाजपचेच 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या या प्रत्युत्तरामुळे आता नव्या चर्चांना उधान आलं आहे.


दानवे यांनी शुक्रवारी त्यांचा वाढदिवस आणि धुळवड साजरी करताना एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, ''मविआचे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावं सांगून त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही. निवडणुका येऊ द्या, एक एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील''  दरम्यान दानवेंच्या या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं. त्यात आता शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर पलटवार केला असून ते म्हणाले, ''उलट भाजपचेच 25 आमदार आमच्या संपर्कात असून तेच सुरक्षित ठेवा.'' असं बोलत सत्तार यांनी भाजपला एकप्रकारे आव्हान दिलं आहे.  


एमआयएम-मविआ युती प्रकरणावरही सत्तार यांची प्रतिक्रिया


राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात झालेल्या भेटीनंतर एमआयएम आणि महाविकास आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू झाली. यावर सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, ''राजेश टोपे जे इम्तियाज जलील यांना बोलले हे त्यांचे वैयक्तिक मत असून या विषयी अंतिम निर्णय हे महायुती आघाडीचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हेच घेतील.''


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha