Maharashtra Coronavirus Update : महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus) वेग थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांमुळे सामान्य नागरिक आणि प्रशासन दोघांचीही चिंता वाढली आहे. मंगळवारी (11 एप्रिल) राज्यात 919 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 4 हजार 875 सक्रिय रुग्ण आहेत. मृत्यू दराबाबत बोलायचे झाले तर राज्यात 1.82 टक्के तर बरे होण्याचे प्रमाण 98.12 टक्के आहे.


एका दिवसापूर्वीच कोरोना रुग्णांमध्ये घट 


महाराष्ट्रात एका दिवसापूर्वी कोरोनाच्या (COVID 19) रुग्णांमध्ये घट पाहायला मिळाली होती. सोमवारी (10 एप्रिल) राज्यात कोरोनाचे 328 रुग्ण आढळले होते आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर रविवारी (9 एप्रिल) राज्यात कोविड-19 च्या 788 रुग्णांची नोंद झाली होती. 


मुंबईत कोरोनाचे  (Mumbai Corona Update) सर्वाधिक रुग्ण आढळले 


मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, एकट्या मुंबईत कोरोनाचे 242 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर नागपुरात 105, पुण्यात 58 आणि नवी मुंबईत 57 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे, राज्यातील एकमेव मृत्यूची नोंद अकोला शहरात झाली आहे.


महाराष्ट्रात कोरोनाचे 4,875 सक्रिय रुग्ण  


नव्या आकडेवारीनुसार, मंगळवारी राज्यात 710 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या 4 हजार 875 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दराबाबत बोलायचे झाल्यास राज्यात 1.82 टक्के तर बरे होण्याचे प्रमाण 98.12 टक्के आहे. हेल्थ बुलेटिननुसार राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 12 हजार 841 नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून, यासह राज्यात आतापर्यंत कोरोना चाचण्यांची संख्या 8,67,23,707 वर पोहोचली आहे. कोरोनासंदर्भातील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार देशातील सर्व रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल करण्यात येत आहे.


मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य


कोरोना पुन्हा एकदा (Coronavirus Mumbai) डोकं वर काढू पाहतंय, त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगपालिकेने (BMC) तयारी सुरु केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Hospitals) सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती (Mask Compulsory) करण्यात आली आहे.


सतर्क राहण्याची आवश्यकता


केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राज्यांसह कोरोना लसीकरणासंदर्भात आढावा घेतला. केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी सांगितले की, "आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे." लोकांमध्ये अनावश्यकपणे भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधांचा आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना दिले. 


संबंधित बातम्या 


Mumbai Corona Updates: मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य