Maharashtra Coronavirus Cases Today : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये कमालीची घट पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात 955 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासात राज्यात 972 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी राज्यात 1076 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली होती. तर सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.
राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 972 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 79,54,052 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.08 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 955 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज चार करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे.
राज्यात एकूण 7,061 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases)
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात सध्या 7,061 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये दोन हजार 85 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात एक हजार 532 सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार 721 इतकी आहे. त्यानंतर पालघर 158, रायगड 281, नाशिक 186, नागपूर 138 आणि चंद्रपूरमध्ये 161 सक्रिय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 100 पेक्षा कमी आहे. राज्यात सर्वात कमी सक्रिय रुग्ण यवतमाळमध्ये आहेत. यवतमाळमध्ये सध्या फक्त चार सक्रिय रुग्ण आहेत. हिंगोलीमध्ये पाच तर परभणीमध्ये सहा सक्रिय रुग्ण आहेत. बीड आणि गोंदिया जिल्ह्यात सात सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आज 955 कोरोना रुग्णांची नोंद -
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज 955 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 81,09,397 इतकी झाली आहे. आज राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबई सर्कलमध्ये आढळले आहेत. मुंबई सर्कलमध्ये आज 518 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एकट्या मुंबईमध्ये आज 251 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. नाशिक सर्कलमध्ये 53 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मालेगाव मनपा, धुळे, धुले मनपा येथे एकाही कोरोना रुग्णाची नोंद नाही. पुणे सर्कलमध्ये आज 225 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. यामध्ये पुणे मनपामध्ये 134 रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर सर्कलमध्ये आज 49 नव्या रुग्णांची नोंद जाली आहे. औरंगाबाद सर्कलमध्ये आज 17 रुग्णाची नोंद झाली आहे. यामध्ये परभणी मनपामध्ये एकही रुग्ण आढळला नाही. लातूर सर्कलमध्ये 10 कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. नांदेड, लातूर मनपामध्ये एकाही रुग्णाची नोंद नाही. अकोला सर्कलमध्ये आज 28 नव्या रुग्णाची नोंद. यामध्ये अमरावतीमध्ये शून्य कोरोना रुग्ण आढळले आहेत. नागपूर सर्कलमध्ये 55 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. यामध्ये वर्धामध्ये एकाही रुग्ण आढळला नाहीत.