Maharashtra Coronavirus Cases Today : राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे.  राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात दोन हजार 40 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिलासादायक म्हणजे, मागील 24 तासांत दोन हजार 48 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनं टेन्शन वाढवलेय. शनिवारी मुंबईत 867 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 


मागील काही दिवसांत आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 
शनिवार - 2040
शुक्रवार - 1975 
गुरुवार - 1877 
बुधवार - 1847
मंगळवार - 1782 


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 2048 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 79,10,243 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.02 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 2040 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज एका करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.83 टक्के एवढा आहे.


सक्रीय रुग्ण किती?
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 11847 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मोठ्या शहरात सक्रीय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये चार हजार 624 सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाणे 1401, पुणे 2119, नागपूर 652 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात सर्वात कमी सक्रीय रुग्ण परभणीमध्ये आहेत. परभणीमध्ये 14 सक्रीय रुग्ण आहेत. 


राज्यात आज सर्वाधिक रुग्ण कुठे आढळले?
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 2040 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या  80,70,258 इतके झाले आहेत. राज्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये आज 867 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे मनपामध्ये 159 रुग्ण आढळले. राज्यात इतर ठिकाणी 100 पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. सोलापूर मनपामध्ये आज एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. तर जळगाव, परभणी आणि अमरावती मनपामध्ये फक्त एका कोरोना रुग्णांची नोंद झाली.


देशातील स्थिती काय?
 देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शुक्रवारी दिवसभरात 15 हजार 815 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आदल्या दिवसाच्या तुलनेत गेल्या 24 तासांत नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ही एक दिलासादायक बातमी आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत शुक्रवारी 746 रुग्णांची घट झाली आहे. तर दुसरी दिलासादायक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या 24 तासांत 20 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या भारतात 1 लाख 19 हजार 264 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात 20 हजार 18 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 35 लाख 93 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.27 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.54 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 20,018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 4.36 टक्के आहे.