Maharashtra Corona Cases :राज्यात आज तर 24,752 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 23,065 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 453 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसानंतर कमी आली आहे.  राज्यात आज एकूण 3,15,042 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  


आजपर्यंत एकूण 52,41,833 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.76% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 453 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.62 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,38,24,959 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,50,907 (16.77 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 23,70,326 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 19,943 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


'या' शहर आणि जिल्ह्यात एकही मृत्यू नाही


आज गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा, धुळे जिल्हा, लातूर शहर, परभणी शहर, उल्हासनगर शहर, भिवंडी शहर, मीरा भायंदर शहर, कल्याण डोंबिवली शहर, ठाणे शहर, औरंगाबाद शहर, जळगाव शहर, धुळे शहर या ठिकाणी कोरोनामुळं एकाही मृत्यूची नोंद नाही. तर नवी मुंबई, वसई विरार, मालेगाव, अमरावती शहर परिसरात आणि औरंगाबाद, पालघर, चंद्रपूर जिल्ह्यात एका व्यक्तिचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला असल्याची माहिती सरकारी आकडेवारीतून समोर आली आहे. 


मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर


मुंबईत मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6 लाख 56 हजार 446 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 348 दिवसांवर गेला आहे.  मुंबईत सध्या 27,943 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  मुंबईत रिकव्हरी रेट वाढला असला तरी कालपेक्षा आज दैनंदिन रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. काल 1,037 रुग्णांचे निदान झाले होते तर 1417 रुग्ण बरे होऊन घरी गेले होतं. तर आज 1362 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.


पुणे शहरात आज 683 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुणे शहरात आज नव्याने 683 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 67 हजार 541 इतकी झाली आहे. शहरातील 1 हजार 158 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 51 हजार 70 झाली आहे.  पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 8 हजार 356 रुग्णांपैकी 1020 रुग्ण गंभीर तर 2124 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात 8 हजार 751 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 24 लाख 60 हजार 516 इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 37 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8  हजार 115 इतकी झाली आहे.