मुंबई : राज्यात आज गेल्या 74 दिवसांतील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. आज राज्यात 10 हजार 891 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर दिवसभरात 16,577 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण 55,80,925 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.35% एवढे झाले आहे. दरम्यान आज 295 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.73 टक्के इतका आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,69,07,181 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,52,891 (15.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 11,53,147 व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर 6,225 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,67,927 सक्रीय रुग्ण आहेत.
मुंबई-पुणे शहरात कोरोना आटोक्यात?
पुणे
पुणे शहरात आता कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येतान दिसत आहे. आज 297 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता 472728 इतकी झाली आहे. सध्या शहरात 3699 सक्रीय रुग्णावर उपचार सुरु आहेत. आज 529 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 4,60,607 इतकी आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 12 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 422 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 3 हजार 399 रुग्णांपैकी 589 रुग्ण गंभीर तर 1,178 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
मुंबई
मुंबईत तब्बल 78 दिवसानंतर मृत्यूचा आकड्याची एका अंकात नोंद झाली आहे. मुंबईत मागील 24 तासात 673 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 751 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6,80009 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 543 दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या 15, 701अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
अनेक दिवसानंतर म्हणजे तब्बल 78 दिवसानंतर मृत्यूचा आकड्याची एका अंकात नोंद झाली आहे. मुंबईत मागील 24 तासात 673 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 751 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6,80009 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 543 दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या 15, 701अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.