मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. आज तब्बल 56 हजार  647 रुग्णांचे निदान झाले. तर 51, 356 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण 39,81,658 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण (Recovery Rate) 84.31% एवढा झाला आहे. तर आज राज्यात 62,919 नवीन रुग्णांचे निदान झाले. दरम्यान आज 669 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,76,52,758 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 47,22,401 (17.08 टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 39,96,946 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 27,735 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


गेल्या 24 तासात भारतात कोरोनाच्या 3.92 लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे तर मृतांचा आकडा 3689 इतका झाला आहे. शुक्रवारी देशात चार लाख रुग्ण संख्या वाढली होती. देशातील कोरोनाची रोजची ही वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनामुळे 3500 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात सध्या जगाच्या तुलनेत कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे


राज्यात 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण सुरु
राज्यात  1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज 26 जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण 132 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले  आहे. 18 ते 44  वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला 26 जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली. उर्वरीत जिल्ह्यांमध्ये उद्या 2 मे पासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे 3 लाख डोसेस खरेदी केले आहेत.  वयोगटासाठी आज सर्वाधिक लसीकरण पुण्यात झालं. पुण्यात 19 केंद्रांवर 1316 जणांचं लसीकरण झालं. तर मुंबईतील पाच केंद्रांवर 1004 जणांचं लसीकरण झालं.