Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये होणारी घट आजही कायम आहे. आज रुग्णसंख्या थेट 500 खाली पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात 407 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत राज्यात फक्त चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 407 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. दिवसभरात एक हजार 967 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  राज्यात आजपर्यंत एकूण 77, 11, 343 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.04 % इतके झाले आहे. राज्यात सद्यस्थितीला 6, 663 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात आज झालेल्या चार कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 % इतका झाला आहे. सध्या राज्यात 1,32,886 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 653 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


मुंबईत 73 नवे कोरोनाबाधित


मुंबईत आज रुग्णसंख्या थेट 100 च्या आत पोहोचल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. आज मुंबईत नव्या 73 कोरोनाबाधितांचीच नोंद झाली आहे. दरम्यान कमी झालेल्या या रुग्णसंख्येमुळे पालिका प्रशासनालाही (BMC) दिलासा मिळाला आहे.  मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 73 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 95 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 815 इतकी झाली आहे. मुंबईच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 73 रुग्णांपैकी 7 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 35 हजार 927 बेड्सपैकी केवळ 699 बेड वापरात आहेत. 


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha