मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 18 हजार 067  नव्या रुग्णांची भर पडली असून 79 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 36 हजार 281  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  


राज्यात आज 113 ओमायक्रॉनबाधितांची नोंद  

राज्यात आज  113 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाले आहे.  आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज 79 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 79 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.84 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 74 लाख 33 हजार 633  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.87 टक्के आहे.  सध्या राज्यात 9 लाख 73 हजार 417 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2617  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 49 लाख 51 हजार 750  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एक हजारांहून अधिक

मुंबईत बुधवारी 1 हजार 128 नवे कोरोनाबाधित आढळले असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासांत 1 हजार 838 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे. सध्या मुंबईतील 4 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 1 हजार 838 रुग्णांपैकी 108 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 185  बेड्सपैकी केवळ 1 हजार 953 बेड वापरात आहेत.  


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha