मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 11 हजार 394  नव्या रुग्णांची भर पडली असून 68 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 21 हजार 667  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद  नाही


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज 68 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज 68 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 75 लाख  13 हजार 436  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.40 टक्के आहे.  सध्या राज्यात  7 लाख 95 हजार 422 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2447  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 54 लाख 10 हजार 043 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


देशात 24 तासांत एक लाख 28 हजार कोरोनाबाधित


देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. मागील 24 तासांत देशभरात एक लाख 27 हजार 952 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, 1059 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. गुरुवार-शुक्रवारच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. शुक्रवारी 24 तासांमध्ये एक लाख 49 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. देशात संसर्गाचा पॉझिटीव्हीटी दर हा 7.98 टक्के इतका झाला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :