मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 7 हजार 142 नव्या रुग्णांची भर पडली असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 20 हजार 222 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 92 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 92 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 75 लाख 93 हजार 291 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.06 टक्के आहे. सध्या राज्यात 5 लाख 78 हजार 076 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2396 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 59 लाख 05 हजार 676 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत नव्या 441 कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 441 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 115 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 4 हजार 096 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 840 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 32 दिवसांची वाढ झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.08% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत नऊ रुग्णांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा :
- Covid19 Death : फ्रंटलाईन वर्कर्सच्या कुटुंबीयांना 808 कोटींची नुकसानभरपाई, जाणून घ्या तुमच्या राज्यासाठी किती रक्कम
- Covid19 : सावधान! सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळले कोरोनाचे चार 'गुप्त' प्रकार, धोका वाढण्याची शक्यता
- कोरोनाकाळात रुग्णांकडून घेतलेले जास्तीचे पैसे परत न करणाऱ्या रुग्णालयांची नोंदणी रद्द करणार, जिल्हा शल्यचिकित्सकांचा इशारा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha