मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 6 हजार 248 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत आज 894 रुग्णांची वाढ झाली असून 45 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 18 हजार 942 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 121 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 121 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3455 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 2291 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,164 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज 45 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 45 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 12 हजार 233 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.22 टक्के आहे. सध्या राज्यात 5 लाख 53 हजार 175 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2386 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 60 लाख 40 हजार 567 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत 429 नवे कोरोना रुग्ण
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत 429 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 822 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 3 हजार 698 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 949 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये तब्बल 109 दिवसांची वाढ झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Mumbai Corona Update : मुंबईकरांना आजही दिलासा, रुग्णसंख्येतील घट कायम
Covid19 : कोरोनाचा डोळ्यांवर परिणाम; 90 टक्के लोकांच्या दृष्यमानतेत फरक झाल्याचा दावा
Omicron Variant : ओमायक्रॉनमधून रिकव्हर होणाऱ्यांना जाणवतायत ‘या’ समस्या, जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha