मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) चढ उतार  होताना  दिसत आहे.   शुक्रवारी राज्यात  148 रुग्णांचे निदान झाले आहे.  राज्यातील  ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील  एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या  979 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नागी. राज्यात गेल्या 24 तासात  128  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात आज दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू


राज्यात आज  दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,28, 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 8,01,61, 150  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


राज्यात सध्या  979 अॅक्टिव्ह रुग्ण 


राज्यात सध्या 979 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 587  अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात 216,  ठाण्यात 92 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.


गेल्या 24 तासांत 3,377 नवे कोरोनाबाधित


 देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतोय. देशात गेल्या 24 तासांत 3,377 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गुरुवारी दिवसभरात 2,496 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजार  झाली आहे. काल 3,303 नवीन रुग्णांची नोंद झाली. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 801 इतकी झाली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 2,496 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 753 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 72 हजार 176 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.