मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 937 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.आज राज्यात 130 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 102 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,25, 553 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 94, 53 , 522 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 937 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 937 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 290 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 145 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशात गेल्या 24 तासांत 1260 नव्या रुग्णांची नोंद
देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1260 नव्या रुग्णांची नोद झाली असून 83 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1335 रुग्णांची नोंद आणि 52 रुग्णांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात शुक्रवारी दिवसभरात 1 हजार 404 कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन कोरोनाबाधितांची संख्या 13 हजार 445 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 21 हजार 264 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 92 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 27 हजार 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha