Maharashtra Corona Update : कोरोनातून थोडाफार दिलासा मिळत असनात पुन्हा डोकेदुखी वाढवणारी माहिती समोर आली आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि देशात देखील कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी घट झालीय. परंतु, आता पुन्हा यात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात आज 30 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर  आज 27 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,87,851 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98. 17 टक्के झालाय. 


आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. मुंबईत आज आठ नव्या रूग्णांची नोंद झाली असून सध्या 37 सकिय रूग्ण आहे.  मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. दरम्यान, जगभरात कोविड-19 रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी घेतला कोविड-19 स्थितीचा आणि स्थितीवर देखरेख, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य प्रणालीच्या सज्जतेचा आढावा घेतला आहे. 


महाराष्ट्रात कमी रूग्णसंख्या असणे ही राज्यासाठी दिलासा देण्यासारखी बाब असतानाच चीनमधील कोरोना रूग्णांच्या वाढीने राज्यासह देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. परंतु, राज्यात 95 टक्के लसीकरण झाल्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. 


"आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्या संदर्भात आढावा घेतला आहे. जे परदेशातून पर्यटक येत आहेत त्यांची तपासणी करण्यात येत आहे. चीन मधून येणाऱ्या लोकांची प्राधान्याने तपासणी केली जाणार असल्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.  


महत्वाच्या बातम्या 


China: ना सरकारी कार्यालयं ना बाजार बंद, चीनमधील कोरोनाच्या बातम्या अतिरंजित आणि चुकीच्या; डॉ. अचल श्रीखंडे यांचा चीनमधून संवाद