Maharashtra Corona Update :  राज्यात रविवारी 2082 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 1824 रूग्णांनी कोरोनावर मात केलीय. आजपर्यंत राज्यात 79, 12, 067 रूग्णांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे राज्यातील रूग्णा बरे होण्याचे प्रमाण 98.01 टक्के झाले आहे. 


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1. 83 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 12 हजार 102 रूग्ण सक्रिय आहेत. यात मुंबईत सर्वात जास्त म्हणजे 5 हजार 41 रूग्ण सक्रिय आहेत. मुंबईपाठोपाठ ठाण्यात 1467 रूग्ण सक्रिय आहेत.  


शनिवारच्या तुलनेत रविवारी रूग्णांमध्ये वाढ
राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत चढउतार होत आहेत. शनिवारी राज्यात दोन हजार 40 रूग्णांची नोंद झाली होती. तर रविवारी शनिवारच्या तुलनेत  42 रूग्णांची वाढ झाली. रविवारी राज्यात दोन हजार 82 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. 


देशातील स्थिती
देशात काल सलग दुसऱ्या दिवशी कोरोना संसर्गामध्ये घट झाल्याचं आढळून आलं आहेत. देशात शनिवारी दिवसभरात अर्थात गेल्या 24 तासांत 14,092 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत ही रुग्ण संख्या कमी झाली आहे. आदल्या दिवशी शुक्रवारी देशात 15 हजार 815 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. याच्या तुलनेनं नव्या आकडेवारीनुसार, नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत 1,723 रुग्णांची घट झाली आहे, ही चांगली बाब आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे.


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 16 हजारांवर