मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Maharashtra Corona Update) स्थिर असून आज 1832 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 2055 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्या आधी शनिवारी राज्यामध्ये 1,855 रुग्णांची नोंद झाली होती. 


राज्यात आज 11,641 इतके सक्रिय रुग्ण आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये असून ती 5761 इतकी आहे. त्या खालोखाल ठाणे जिल्ह्याचा क्रमांक असून ठाण्यात 1925 इतके रुग्ण सक्रिय आहेत. राज्यामध्ये आतापर्यंत 79,24,547 इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं 98.02 टक्के इतकं झालं आहे. तसेच आज दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील रुग्ण मृत्यूचे प्रमाण 1.83 टक्के इतकं झालं आहे.  राज्यात सर्वाधिक म्हणजे 40,014 मृत्यू हे ठाणे जिल्ह्यात झाले आहेत.


राज्यात आजपर्यंत 8,38,38,036 इतक्या प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 80,84,383 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.


दरम्यान, देशात कॉर्बेव्हॅक्स लस 12 ऑगस्टपासून सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करण्यात आली असून ती 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असेल. यासाठी नागरिकांना COWIN अॅपवर बूस्टर डोससाठी नोंदणी मात्र करावी लागणार आहे. कॉर्बेव्हॅक्स निर्मात्या कंपनीचा दावा आहे की, या लसीच्या भारतीय रुग्णांवर व्यापक बूस्टर चाचण्या झाल्या आहेत आणि त्यानंतर भारतीय नियामक प्राधिकरणाकडून त्याच्या वापराला मान्यता मिळाली आहे. कॉर्बेव्हॅक्स ही विषम कोविड-19 बूस्टर म्हणून मान्यता मिळालेली भारतातील पहिली लस आहे. आरोग्य मंत्रालयाने या लसीला दिलेली मान्यता ही साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. 


ज्या नागरिकांनी Covaxin किंवा Covishield लशीचे दोन डोस घेतले आहेत, ते नागरिक कॉर्बेव्हॅक्स या मिक्स्ड लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात. हैदराबादच्या बायोलॉजिकल-ई कंपनीकडून विकसित कॉर्बेव्हॅक्स लसीला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: