Maharashtra Corona Update : राज्यात आज 1205 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1532 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शनिवारी राज्यात 1272 कोरोना रुग्णाची भर पडली होती. 


तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू - 
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 1532 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 79,48, 226 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.07 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 1205 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  राज्यात आज तीन करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.


सक्रीय रुग्ण किती?
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या आठ हजार 364 सक्रीय रुग्ण आहेत. यामध्ये मुंबईमध्ये 2949 सक्रीय रुग्ण आहेत. त्याशिवाय, ठाणे 1882 आणि पुणे 1735 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी एक हजार पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत. जळगावमध्ये सर्वात कमी सक्रीय रुग्ण आहेत. जळगावमध्ये तीन सक्रीय रुग्ण आहेत.  नदूरबारध्ये पाच सक्रीय रुग्ण आहेत. हिंगोलीमध्ये सहा सक्रीय रुग्ण आहेत. 


आज सर्वाधिक रुग्ण कुठे आढळले? 
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज 1205 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 81,04,854 इतकी झाली. राज्यात आज सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहे. मुंबईमध्ये 376 नव्या रुग्णाची भर पडली. त्याशिवाय पुणे मनपामध्ये 171 नव्या रुग्णाची भर पडली. इतर जिल्ह्यातील रुग्णाची संख्या 100 पेक्षा कमी आहे.  मालेगाव मनपा, अहमदनगर मनपा, धुळे मनपा, नंदूरबार,  परभणी मनपा, लातूर मनपा, नांदेड, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम या ठिकाणी आज एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.


देशातील स्थिती काय?
देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात 6 हजार 809 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे. त्याआधी शुक्रवारी दिवसभरात 7 हजार 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे तुलनेत 410 रुग्णांची घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत सक्रिय कोरोना रुग्णांमध्येही मोठी घट झाली आहे. सध्या देशात 55 हजार 114 कोरोनाबाधित उपचाराधीन आहेत. तर शनिवारी दिवसभरात 8 हजार 414 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.12 टक्के इतकं घसरलं आहे. त्याशिवाय रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 98.69 टक्के झालं आहे.