Maharashtra Corona Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात 99  नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,72,512 इतकी झाली आहे. मागील 24 तासांत राज्यात 180 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 77,23,468 इतकी झाली आहे.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11% एवढे झाले आहे. सकारात्मक बाब म्हणजे, राज्यात आज एकाही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा आहे. तर राज्यात सध्या एकूण 1,273 सक्रीय रुग्ण आहेत.


36 ठिकाणी एकही कोरोना रुग्ण नाही –
ठाणे, उल्हासनगर मनपा, भिवंडी निजामपूर मनपा, पालघर, नाशिक, नाशिक मनपा, मालेगाव मनपा, धुळे, धुळे मनपा, जळगाव मनपा, नंदूरबार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर मनपा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जालना, हिंगोली, परभणी, परभणी मनपा, लातूर मनपा, उस्मानाबाद, नांदेड, नांदेड मनपा, अकोला, अकोला मनपा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, नागपूर मनपा, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या ठिकाणी एकही कोरोना रुग्णांची नोंद झालेली नाही. 


मुंबईत सर्वाधिक रुग्ण - 
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात 99 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सोमवारी 28 नवीन कोरोना रुग्णांचीनोंद झाली आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड मनपामध्ये 13 रुग्ण आढळले आहेत. तर पुणे मनपामध्ये 11 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई, पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवडचा अपवाद वगळता राज्यात इतर ठिकाणी नवीन कोरोना रुग्णांची संख्या दहाच्या आत आहे.


चार ठिकाणी शून्य सक्रीय रुग्ण - 
राज्यात सध्या 1273 रुग्ण सक्रीय आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 358 सक्रीय रुग्ण आहेत.  त्यानंतर पुणे 299, ठाणे 152, नाशिक 71, अहमदनगर 137 सक्रीय रुग्ण आहेत. नंदूरबार, धुळे, हिंगोली आणि यवतमाळ या चार ठिकाणी एकही सक्रीय रुग्ण नाही.


 देशात गेल्या 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांमध्ये 12 टक्क्यांनी घट, 1549 नवीन रुग्ण आणि 31 मृत्यू
देशातील कोरोना संसर्गात सातत्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 1,549 नवीन रुग्ण आढळले असून 31जणाचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4,30,09,390 वर पोहोचली आहे. सध्या देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 25,106 वर गेली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 16 हजार 510 झाली आहे.