Mumbai : मुंबईत (Mumbai) सिंगल यूज (Single-Use Plastic) वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक विरोधातील मोहीम सुरू ठेवत, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) जून 2018 ते जानेवारी 2022 दरम्यान दोन लाख किलोग्रॅम प्रतिबंधित साहित्य जप्त केले होते. तसेच, फेरीवाले, रेस्टॉरंट, दुकाने आणि इतरांकडून जवळपास 5.36 कोटी रुपयांचा दंड वसूल देखील केला होता. कोरोना महामारीत ही मोहिम तात्पुरती थांबवली होती. मात्र, प्लास्टिकचा सर्रास वापर सुरुच आहे आहे. 


कोविड-19 महामारीच्या काळात ही मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली होती


सरकारने मार्च 2018 मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, कप, चमचे, प्लेट्स आणि टिफिन कंटेनरसह डिस्पोजेबल प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली होती. वापरकर्ते, किरकोळ विक्रेते आणि प्लास्टिकची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर, साधारण एक वर्षानंतर ही मोहीम मंदावली आणि सिंगल यूज प्लास्टिक बाजारात उपलब्ध होऊ लागले. कोविड-19 (Covid-19) महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान ही मोहीम तात्पुरती बंद करण्यात आली होती.


1 जुलैपासून पुन्हा संपूर्ण मुंबईत प्लास्टिक बंदी लागू होणार 


केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) या वर्षी 1 जुलैपासून काही सिंगल यूज वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तूंवर संपूर्ण बंदी लागू केली जाईल, असे सांगितल्यानंतर हे पाऊल पुढे आले आहे. या संदर्भात सीपीसीबीने उत्पादक, स्टॉकिस्ट आणि ई-कॉमर्स साईट्सना नोटीस जारी केली आहे. जेणेकरून या वस्तूंचा वापर आणि विक्री केली जाणार नाही. CPCB च्या निर्देशानंतर, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने 8 मार्च रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये 100 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक घटक वापरणाऱ्या सर्व वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha