मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे.  राज्यात आज 9, 195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,634 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 58,28, 535 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.01 टक्क्यावर गेला आहे.


तर राज्यात आज 252 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 667 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे, कोल्हापुरात 1057 रुग्ण तर मालेगावात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.


राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांपैकी यवतमाळमध्ये सर्वात कमी 43 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 17 हजार 86 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 18 लाख  75 हजार 217 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 70 हजार 599 (14.05 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 15 हजार 285 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 339 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबई आज 661 रुग्णांची नोंद, तर 21 रुग्णांचा मृत्यू


मुंबईत गेल्या 24 तासात 661 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 489 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 96 हजार 594 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8498 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 733 दिवसांवर गेला आहे. 


देशात 48,786 नव्या कोरोनाबाधितांची नोंद 


देशात काल 48,786 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 1005 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यापूर्वी सोमवारी 46148, मंगळवारी 37,566 आणि बुधवारी 45,951 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 61,588 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात सलग 49व्या दिवशी कोरोनाबाधितांहून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक आहे. 30 जूनपर्यंत देशात 33  कोटी 57 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर बुधवारी 27.60 लाख लसीचे डोसही देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 41 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.