मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 42,462 नव्या रुग्णांची भर झाली असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 39,646 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलगपणे राज्यात 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होतेय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.
राज्यात 125 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 125 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1730 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 879 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 23 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 23 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.97 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 लाख 60 हजार 514 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे. सध्या राज्यात 22 लाख 108 रुग्ण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 6102 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,17,64,226 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.