मुंबई : राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शनिवारी राज्यात तब्बल 2922 रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 1745 रुग्ण हे मुंबईतील आहे आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.
मुंबईकरांची चिंता वाढली
आज राज्यात 2922 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 1392 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 1745 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनाच्या एका मृत्यूची नोंद झाली आहे.
आज एका कोरोना मृत्यूची नोंद
राज्यात आज एकूण 1392 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,44, 905 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.94 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला आहे.
सक्रिय रुग्णसंख्या वाढली
राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 14858 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 10047 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 2460 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
देशात 8 हजारांहून अधिक नवे रुग्ण
गेल्या 24 तासांत 8329 नवीन रुग्ण आढळले असून, त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजार 370 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, या काळात कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, सकारात्मकता दर (Positivity Rate) (2.41%) समान साप्ताहिक पॉझिव्हिटी दर (1.75%) पर्यंत पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 4 हजार 216 लोक कोरोनापासून बरे झाले असून, त्यानंतर बरे होण्याचा आकडा 4 कोटी 26 लाख 48 हजार 308 वर गेला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती,