मुंबई: शुक्रवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी कमी झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यात आज 2760 नव्या रुग्णांची भर पडली असून 2934 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


राज्यात आतापर्यंत 78,34,785 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.92 टक्के इतकं आहे तर मृत्यू दर 1.84 टक्के इतका आहे. आजपयंत तपासण्यात आलेल्या 8,23,45,327  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 80,01,433 (9.72 टक्के) नमनु पॉझिटिव्ह आले आहेत.
 
राज्यात आज 18,672 सक्रिय रुग्णांची संख्या आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 6371 रुग्णसंख्या पुण्यातील असून त्यानंतर 4,115 रुग्ण मुंबईत आढळले आहेत.  


देशातील स्थिती
देशात गेल्या 24 तासांत नवीन कोरोनाबाधितांसह कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या 18 हजार 840 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 43 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्या आकडेवारीनुसार, 16 हजार 104 रुग्णांनी गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसंर्गावर मात केली आहे. यासह आतापर्यंत देशात एकूण 4 कोटी 29 लाख 53 हजार 980 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.