Maharashtra Coronavirus Update : शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी राज्यात दोन हजार 87 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर शुक्रवारी राज्यात 1997 रुग्णांची भर पडली होती.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी दोन हजार 259 जणांनी कोरोनावर मात केली होती. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 78 लाख 84 हजार 495 इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 98.00 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात दोन हजार 87 नव्या रुग्णांची भर पडली. आज राज्यात चार कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84 टक्के एवढा आहे.
सक्रिय रुग्ण कुठे किती?
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 10 इतकी झाली आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. मुंबमध्ये एक हजार 817 तर पुणे जिल्ह्यात चारहजार 70 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाणे 787, रायगड 267, सांगली 235, नाशिक 581, अहमदनगर 455, नागपूर एक हजार 577 सक्रीय रुग्ण आहेत. नंदूरबार आणि हिंगोलीमध्ये सर्वात कमी सक्रीय रुग्ण आहेत. दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी 32 सक्रिय रुग्ण आहेत.
सर्वाधिक रुग्णांची नोंद कुठे?
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी राज्यात दोन हजार 87 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबईमध्ये आज 286, नवी मुंबई 62, नाशिक मनपा 82, पुणे 93, पुणे मनपा 276, पिंपरी चिंचवड 141, सोलापूर 97, नागपूर मनपा 153, भंडारा 74 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. बीड, नंदूरबार आणि जळगावमध्ये एकाही रुग्णांची नोंद नाही.
देशाची स्थिती काय?
देशात कोरोनाबाधितांसह मृत्यूची संख्या किंचित घटली आहे, मात्र धोका कायम आहे. देशात गुरुवारी 20 हजार 409 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी 20 हजार 557 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला. आजच्या रुग्णसंख्येत किंचित घट झाली असली तरी देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजारांवर पोहोचली आहे.