मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यामध्ये केवळ 207 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच या दरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 290 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज चार कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,21, 510 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.09 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 87, 37, 605 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 78,71,566 चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
राज्यात सध्या 2,295 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 2,295 इतकी आहे. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत सध्या 334 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ठाण्यात आहे. ठाण्यात 217 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशातील रुग्णसंख्या
गेल्या 24 तासात देशात 2 हजार 568 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 97 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. देशात 4 हजार 722 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 33 हजार 917 वर आली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत कोरोनामुळं जीव गमावणाऱ्यांची संख्या ही 5 लाख 15 हजार 974 झाली आहे. तर आत्तापर्यंत 4 कोटी 24 लाख 46 हजार 171 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
मुंबईतील स्थिती
मुंबईत नवे 50 कोरोनाबाधित आढळले असून 60 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील कमी झाली असून आज ही संख्या 324 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 50 रुग्णांपैकी 4 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 468 बेड्सपैकी केवळ 108 बेड वापरात आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha