Maharashtra Corona Update : चीन, ऑस्ट्रीया, युरोप खंड आणि फ्रान्ससारख्या देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. महाराष्ट्रातही कोरोना रग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर महत्वाच्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात फक्त 97 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायकबाब म्हणजे, राज्यात 19 ठिकाणी शनिवारी एकही नवीन कोरोना रुग्ण आढळला नाही. राज्यात कोरोनाचा प्रवेश झाल्यापासून तीन लाटेमधील सर्वात कमी रुग्णसंख्या आज आढळली आहे. तीन एप्रिल 2020 पासून सर्वात कमी रुग्णसंख्या शनिवारी आढळली आहे.  यापूर्वी पहिल्या लाटेच्या सुरुवातीला दोन एप्रिल 2020 ला 88 कोरोना रुग्ण सापडले होते. मागील दोन वर्षात राज्यात कोरोना महामारीने हाहाकार माजवला होता. पण आता कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. 


या ठिकाणी एकही नवीन कोरोना रुग्ण नाही - 
ठाणे (Thane), उल्हासनर, भिवंडी (Bhiwandi), निजामपूर मनपा, मीरा भाईंदर मनपा, वसई विरार मनपा, पनवेल मनपा, मालेगाव मनपा, धुळे (Dhule), धुळे मनपा, जळगाव, जळगाव मनपा, नंदूरबार, सोलापूर (Solapur), कोल्हापूर, सांगली(sangli), सांगली मिरज कुपवाड मनपा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये आज एकही रुग्ण आढळलेला नाही.


तीन ठिकाणी फक्त दोन आकडी रुग्णसंख्या
आज राज्यात फक्त तीन ठिकाणी दहापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. आज सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईमध्ये आढळले आहेत. मुंबईत आज 29 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. पुणे मनपा (PUne) 12. पिंपरी चिंचवड (Pimpri chinchwad) 13 या तीन ठिकाणी कोरोना रुग्णांनी फक्त दुहेरी आकडा गाठला आहे. 


सक्रीय रुग्ण कुठे किती?
शनिवारी राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या एक हजार 525 इतकी झाली आहे.  राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात 518 सक्रीय रुग्ण आहेत. तर मुंबईत 315, ठाणे 166, अहमदनगरमध्ये 144 सक्रीय रुग्ण आहेत. धुळे, हिंगोली, यवतमाळमध्ये एकही सक्रीय रुग्ण नमाही. तर पालघर 9, रन्नागिरी 4, सांगली 7, जळगाव 4, नंदूरबार1, जालना 1, परभणी 9, नांदेड 9, उस्मनाबाद 6, अमरावती 4, अकोला 3, वाशिवाम 3. वर्धा 1, भंडारा 1 चंगद्रपूर 3 आणि गडचिरोलीमध्ये सात सक्रीय रुग्ण आहेत.