Maharashtra Corona Update : कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या आजही कायम असून आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी राज्यात 156 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय मागील 24 तासांत राज्यात 269 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.  ज्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11% एवढे झाले आहे. तसेच आज राज्यात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा आहे. 


सक्रीय रुग्ण कुठे किती?


नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या 1 हजार 159 झाली आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात 308 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबईत 275, ठाणे 146, अहमदनगरमध्ये 122 सक्रीय रुग्ण आहेत. नंदुरबार, धुळे, हिंगोली, यवतमाळमध्ये एकही सक्रीय रुग्ण नाही.


देशात 1581 नवे कोरोनाबाधित


देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1,581 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर, देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4 कोटी 30 लाख 10 हजार 971 वर पोहोचली आहे. तसेच, देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 23,913 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 33 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमवाला आहेत. आतापर्यंत भारतातील एकूण कोरोनामृतांची संख्या 5 लाख 16 हजार 543 झाली आहे.


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha