Maharashtra Corona Guidelines : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली घट लक्षात घेऊन राज्य सरकारनं 14 जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील (Maharashtra Unlock) करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरसह राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे अनलॉक करण्यात आले आहेत. या 14 जिल्ह्यांमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश नाही. त्यामुळं ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई विरार इत्यादी महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांना राज्य सरकारच्या नव्या निर्णयाचा लाभ होणार नाही. 


मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांसह 14 जिल्ह्यांमध्ये उद्या मध्यरात्रीपासून म्हणजेच, 4 मार्च रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून राज्य सरकारचा नवा निर्णय लागू होईल. या निर्णयानुसार, 14 जिल्ह्यांत नाट्यगृहं, सिनेमागृहं, रेस्टॉरंट्स-बार, व्यापारी संकुलं, क्रीडा संकुलं, जलतरण तलाव, धार्मिक स्थळं, पर्यटनस्थळं आणि मनोरंजन पार्कस 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये 50 टक्के क्षमतेची अट कायम ठेवण्यात आली आहे.


मागील काही आठवडे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणांत आल्यानं आता केंद्र सरकारनं नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानं इतर व्यवहारही सुरळीत व्हावे यासाठी या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. राज्यातल्या 14 जिल्ह्यात 4 मार्चपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळेही 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहे.  इतर जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेची अट कायम होणार आहे. 


पाहा व्हिडीओ : मुंबई शहर आणि उपनगरसह राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे अनलॉक 



'या' 14 जिल्ह्यात 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स



  • मुंबई शहर

  • मुंबई उपनगर

  • पुणे

  • भंडारा

  • सिंधुदुर्ग

  • नागपूर

  • रायगड

  • वर्धा

  • रत्नागिरी

  • सातारा

  • सांगली

  • गोंदिया

  • चंद्रपूर

  • कोल्हापूर


काय आहे नवे नियम?



  • राज्यातील सर्व सरकारी, खासगी कार्यालये  100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास परवानगी

  • शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी 

  • रेल्वे किंवा बसने प्रवास करताना लसीचे दोन डोस बंधनकारक 

  • चित्रपटगृहे , मॉल्स आणि इतर ठिकाणी प्रवेश देताना  लसीचे दोन डोस बंधनकारक

  • मनोरंजन आणि उद्यानं, जलतरण तलाव, वॉटर पार्क यांनाही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी

  • लग्नसमारंभ तसंच अत्यंसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले आहेत.


14 जिल्हे अनलॉक करण्याचे निकष 



  • पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 90  टक्क्यांपेक्षा अधिक

  • दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 70 टक्क्यांपेक्षा  अधिक 

  • पॉझिटिव्हीटी रेट हा 10 टक्क्यापेक्षा कमी हवा 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha