Maharashtra Corona Curfew LIVE UPDATES : पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 9957 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

Break The Chain Live UPDATES Maharashtra COVID-19 restrictions : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. बुधवारी म्हणजेच, काल रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. असून पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला 'ब्रेक द चेन' (Break The Chain) असं नाव देण्यात आलं आहे.

Advertisement

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Apr 2021 11:42 AM
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 9957 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 9957 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर तब्बल 114 कोरोना बाधितांचा आज मृत्यू झालाय. हे एका दिवसात झालेले आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू आहेत.  मागील काही दिवसांपासून एंशी ते नव्वद मृत्यू एका दिवसात नोंद होत होते.  मात्र आज त्यामधे मोठी वाढ झालीय.

पार्श्वभूमी

Break The Chain Luve UPDATEs Maharashtra COVID-19 restrictions : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बुधवारी म्हणजेच, काल रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. असून पुढील 15 दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला 'ब्रेक द चेन' असं नाव देण्यात आलं आहे. आज ब्रेक द चेन (Break The Chain) या निर्बंधाचा पहिला दिवस आहे. पुढील 15 दिवस म्हणजे 1 मे पर्यंत राज्यात कलम 144 लागू असणार आहे. त्यामुळे विनाकारण कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. 


नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा : मुख्यमंत्री


कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 'ब्रेक द चेन'मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही. निर्बधांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.


राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही : पोलीस महासंचालक 


राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत काल (बुधवारी) पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही. मात्र जर पोलिसांनी याबाबत विचारणा केली तर कारण मात्र सांगावं लागणार आहे. पुढे बोलताना पोलीस महासंचालक म्हणाले की, या काळात अनेक दुकान बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. परिस्थिति कठिण आहे. लोक जर बाहेर निघत असतील तर त्यांना आधी विचारलं जावं. विनाकारण मारहाण किंवा चार्ज लावू नये असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, असं त्यांनी सांगितलं. तसेच ते म्हणाले की, जर कुणी कायद्याची पायमल्ली करत असेल. सार्वजनिक संपत्तीची नासधुस करत असेल तर कायद्याप्रमाणे कारवाई होणार. आमची विनंती आहे की, आपण आपली स्वतःची काळजी घ्या. मास्क घाला. पोलीस आपल्या बरोबर आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Break The Chain : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू, आज निर्बंधांचा पहिला दिवस; काय सुरु, काय बंद?

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.