मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 796 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 952 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 85 हजार 290 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे.
राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7209 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 73 हजार 24 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 897 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 57 , 28, 280 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 228 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 228 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 216 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,42,392 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.
देशात बुधवारी दिवसभरात 9765 रुग्णांची नोंद, तर 477 मृत्यू
संपूर्ण जग कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनशी (Omicron) झुंज देत आहे. जगभरातील 25 देशांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच दिलासादायक बाब म्हणजे, अद्याप भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. असं असलं तरी जगभरातील ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळं प्रशासनानं सतर्कता बाळगली आहे. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. देशात काल दिवसभरात 9765 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 46 लाख 06 हजार 541 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 477 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 4 लाख 69 हजार 724 वर पोहोचला आहे. तसेच सध्या देशात 99,763 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, ज्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha