Majalgaon Robbery: माजलगाव शहराच्या हद्दीत असणाऱ्या भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत आज गुरवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला. यावेळी सहा अज्ञात दरोडेखोरांनी चूप बैठो हम करोना टेस्ट कर रहे है असे म्हणत घरातील लाखो रुपये लुटले. तसेच घरातील वृद्ध दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून त्यांना काठीने मारहाणही केली. यावेळी दरोडेखोरांनी घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेची लुट करून पोबारा केला.
शेतकरी कुटुंबातील लक्ष्मणराव शिंदे आणि सावित्री लक्ष्मण शिंदे हे वृद्ध दाम्पत्य आपल्या तीन विवाहित मुला सुना नातवंडसह भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत राहतात. मात्र, बुधवारी (1 डिसेंबर) रात्री 11 वाजताच्या सुमारास मोठा मुलगा राजेश शिंदे घरी उशिरा आले. तसेच घरच्या मेन गेटला आतून कुलूप लाऊन आपल्या पत्नीला घेऊन वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. दरम्यान, खालच्या हॉलमध्ये वृद्ध असणारे संजीवनीबाई व लक्ष्मणराव झोपून गेले. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घरच्या मेन गेटचे कुलूप तोडण्याचा आवाज शिंदे वृद्ध दाम्पत्याला आला. दरम्यान 6 अज्ञात दरोडाखोरांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. त्यावेळी शिंदे दाम्पत्यानं आरडा-ओरडा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना हातातील काठीने मारहान करण्यास सुरुवात केली. चूप बैठो हम याह करोना टेस्ट कर रहे है असे दरडावून म्हणत घरातील समानाची नासधूस करत कपाटात धुंडाळा घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी जवळपास अडीच लाखांची लूट करून घरातून पोबारा केला. यात रोख रक्कमीसह सोने-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. अज्ञात दरोडेखोरांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात संजीवनी लक्ष्मण शिंदे यांच्या फिर्यादावरून कलम 395,357, 342 नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो.नि धनंजय फराटे करत आहे. या दरोड्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
ST Workers Strike : आणि चालकाने चक्क हेल्मेट घालून चालविली बस, जाणून घ्या कारण...
Sindhudurg News : हर हर महादेव... सोनगडाच्या पायथ्याशी हजार फूट दरीतील 800 किलोंची तोफ गडावर आणली