मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे.   राज्यात आज 1426  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 776  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  राज्यात आतापर्यंत 65 लाख 3 हजार 733 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.66 टक्के आहे.  


राज्यात आज 26 ओमायक्रॉनबाधितांची नोंद


राज्यात  आज  26  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली  आहे. आतापर्यंत 167 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 72 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज 21 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


 राज्यात आज 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 10 हजार 441  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 91 हजार 464 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 880 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 85 , 49, 133 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


 देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 531 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद


देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यासोबतच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron)ची लागण झालेल्यां रुग्णांमध्येही वेगानं वाढ होत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 6 हजार 531 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 578 रुग्ण आढळून आले आहेत. जाणून घेऊया देशातील कोरोनाची सद्यस्थिती... केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 75 हजार 841 वर पोहोचली आहे. अशातच महामारीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 79 हजार 997 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, उद्या 7141 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 37 हजार 795 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या बातम्या