मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 782 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर  770 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 86 हजार 105 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे.


 राज्यात आज 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7129  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 79 हजार 460  व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 914 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 59 , 63, 184 प्रयोगशाळा  तपासण्या करण्यात आल्या आहे.


 मुंबईत गेल्या 24 तासात 219 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


 मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 219 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 303  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,42,905 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. 


 देशात 24 तासांत 9 हजार 216 दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद


जगाची धाकधूक वाढवणाऱ्या ओमायक्रॉनचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे. देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव (Coronavirus) सुरुच आहे. अशातच काल (गुरुवारी) देशात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आल्याचं निष्पन्न झालं. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 216 नव्या दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 391 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊयात सध्याची कोरोनास्थिती...  केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 99 हजार 976 सक्रिय रुग्ण आहेत. या महामारीमध्ये 4 लाख 70 हजार 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 45 हजार 666 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


Dombivali : 24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका - दुबई - दिल्लीमार्गे मुंबईत आलेला प्रवासी Omicron बाधित



संबंधित बातम्या :