पिंपरी- चिंचवड : राज्यातील पेपर फुटीचं सत्र सुरुच असून आता पुणे पोलिसानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील पेपरफुटीचे प्रकरण समोर आणलंय. लष्कर विभागाचे दिल्लीतील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे जॉईंट डायरेक्टर राजेशकुमार दिनेशप्रसाद ठाकूर यांना अटक करण्यात आली. त्यामुळे लष्कर विभागात खळबळ उडाली आहे. 


जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स अर्थात जीआरईएफ या विभागासाठी ही 31 ऑक्टोबर 2021ला भरती पार पडली. या भरतीत चाळीस परीक्षार्थींना त्यांनी पेपर पुरवले होते. स्वतः पेपर सेट करणाऱ्या ठाकूर यांनीच पेपर फोडल्याच पिंपरी चिंचवड पोलिसांनी समोर आणलंय. ठाकूर यांनी पेपर फोडण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची मागणी केली होती. जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स अर्थात जीआरईएफ विभागातील स्टोअर किपर टेक्निकल आणि मल्टी स्किल वर्कर ड्रायव्हर अर्थात व्हेईकल मेकॅनिक या पदांच्या परीक्षेसाठी हा पेपर होता. मार्चमध्ये पेपर तयार करण्यात आला तर 31 ऑक्टोबर 2021मध्ये ही परीक्षा पार पडली होती. 


सुरुवातीला 36 परीक्षार्थींना पेपर पुरविल्याच समोर आलं होतं आता तपासात हा आकडा वाढून  साठवर पोहचला आहे. 4 जानेवारीला आर्मी ऍन्टीलिजेस ब्युरोने सापळा रचून तिघांना ताब्यात घेत, सांगवी पोलिसांकडे सुपूर्त केलं होतं. त्यावेळी निवृत्त लायन्स नाईक सतीश डहाणे, निवृत्त मिस्त्री श्रीराम कदम आणि एजंट अक्षय वानखेडे यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता. श्रीराम कदमच्या संपर्कात जॉईंट डायरेक्टर ठाकूर आले होते. तेव्हा ठाकूर दिघीतील लष्करी विभागात कार्यरत होते. तेव्हाची ओळख कायम होती, त्यातूनच पुढे पेपर फोडण्यापर्यंत त्यांची मजल गेली. 


यासाठी ठाकूर यांनी पुणे विमानतळावर नऊ लाख रुपये स्वीकारले तर मुलाच्या खात्यावर पाच लाख रुपये पाठविले. अमेरिकेच्या हवॉर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सध्या त्यांचा मुलगा शिकतोय. त्याचा यात संबंध नसल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात दिसून येतंय. पण ठाकूर यांना अटक केल्याने लष्कर विभागात खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Paper Leak : राज्यात पेपर फुटीचं सत्र सुरुच; लष्कराचा पेपर फुटल्याचं झाल्याचं उघड


राज्यातील पेपरफुटीच्या मागे वादग्रस्त महाआयटी पोर्टल?; मंत्रालयातील 'बडे बाबू' आणि राजकारण्यांचा पोर्टलवर वरदहस्त


TET Exam Scam : TET परीक्षा घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन; दोन जणांना सायबर पोलिसांकडून अटक