मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होत आहे. आज  4, 895 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 508 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 44 हजार 388 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.71टक्के आहे. 


राज्यात आज  151 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल  32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 71  हजार 510 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  नंदूरबार (8), धुळे (3), हिंगोली (81), अमरावती (82), वाशिम (91), भंडारा (0) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 458अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


धुळे , परभणी, अकोला, अमरावती मनपा, गोंदिया, चंद्रपूर, भंडाऱ्यात,  आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक 677 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 95,68, 519 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,53, 328(12.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,22,996 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 749 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 



मुंबईत गेल्या 24 तासात 331 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 331 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 473 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,14,639  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4196 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1642 दिवसांवर गेला आहे. 


15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार : मुख्यमंत्री


 15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर  क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा.