पुणे : पुण्यात लागू असलेल्या निर्बंधांमधून पुणेकरांना कोणतीही सुट मिळाली आहे. आज (रविवारी 8 ऑगस्ट ) महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत आधीच्या निर्बंधांपेक्षा बदल करण्यात आलेले आहेत. पुण्यातील दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे दुकावे सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु सुरु राहणार आहे. पुण्यातील निर्बंध शिथील करण्याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पुण्यातील निर्बंधांमधुन सवलत देतोय पण जर पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील पॉझिटिव्हीटी रेट जर सात टक्क्यांच्यावर गेला तर ही शिथिलता पुन्हा मागे घेतली जाईल. त्यामुळे लोकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, असे देखील अजित पवार या वेळी म्हणाले
पुण्यात काय सुरु काय बंद?
- पुण्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार
- हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार रात्री 10 पर्यंत सुरू राहणार
- पुण्यात मॉल्सही रात्री 8 पर्यंत सुरू, लशीचे 2 डोस घेतलेल्यांना प्रवेश
- जलतरण तलाव वगळून इतर इनडोअर आणि आऊटडोअर क्रीडा प्रकार सुरु राहतील.
- शनिवार रविवार सर्व सेवांना दुपारी 4 पर्यंत परवानगी
- शहरातील सर्व उद्याने नियमित वेळेनुसार सुरू राहणार
- पुणेकरांना मास्क लावणे बंधनकारक आहे
- ग्रामीण भागात हॉटेल, दुकाने संध्याकाळी 4 पर्यंत सुरु राहणार
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरामध्ये निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे, मात्र पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात लेव्हल तीनची नियमावली सोमवारपासून लागू केली आहे. ग्रामीणचा रुग्णवाढीचा दर 5.5 आहे. पण तिथे लेव्हल 4 ऐवजी 3 ठेवली आहे. पुणे, पिंपरी चिंववड महानगरात शिथिलता देण्यात येत असली तरी कोरोना वाढणार नाही याची खबरदारी प्रत्येकोने घेतली पाहीजे. पुण्यातील प्रमाण 3.3 आणि पिंपरी चिंचवड 3.5 आणि ग्रामीणचे संसर्गाचे प्रमाण 5.5 आहे. ग्रामीण रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आल्यानंतर तिथे शिथिलता दिली जाईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
हॉटेल आणि रेस्टॉरंटला 50टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी आहे. प्रत्येक15 दिवसांनी मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात हॉटेल फक्त 4 वाजेपर्यंत खुले राहतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.