मुंबई : कोरोनाबाधितांच्या  (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज  569 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 498  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 93  हजार 002 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. 


राज्यात आज दोन ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद 


राज्यात आज दोन ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैकी एक रुग्ण पुणे  आणि एक रुग्ण लातूरमधील आहे. आतापर्यंत 20 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 9 जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज पाच कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


 राज्यात आज पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 507 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 74 हजार 190 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 887 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 69 , 58, 681 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


 देशात गेल्या 24 तासांत 7350 नवे कोरोना रुग्ण


देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Coronavirus) चा प्रादुर्भाव सुरुच आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 7 हजार 350 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 202 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 38 रुग्ण समोर आले आहेत. जाणून घेऊया देशातील कोरोनाची सध्याची स्थिती... केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 91 हजार 456 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशातच या महामारीमुळे जीव गमालेल्यांचा आकडा वाढून 4 लाख 75 हजार 636 वर पोहोचला आहे. तर 7973 रुग्ण काल दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा 3 कोटी 41 लाख 30 हजार 768 वर पोहोचला आहे. 


Aurangabad : औरंगाबादकरांनो, लस घेतली नाही तर 500 रुपये दंड भरा! 15 तारखेपासून नियमाची अंमलबजावणी



महत्त्वाच्या इतर बातम्या :