Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत असल्याचं आकडेवारीवरुन दिसत आहे. राज्यात आज 1 हजार 573 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 968 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 30 हजार 394 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के आहे. राज्यात आज 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 24 हजार 292 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 429 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 429 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 435 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,29,131 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 5 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4537 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1328 दिवसांवर गेला आहे.
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू नाही
पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. पुणे शहरात आज नव्याने 79 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 5 लाख 3 हजार 548 इतकी झाली आहे. शहरातील 83 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 93 हजार 497 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 710 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 35 लाख 00 हजार 547 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 984 रुग्णांपैकी 163 रुग्ण गंभीर तर 161 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.
देशात गेल्या 24 तासात 14 हजार 623 नव्या रुग्णांची नोंद, 197 मृत्यू
देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या (Covid19) संख्येत आज वाढ पाहायला मिळाली आहे. देशात गेल्या 24 तासात 14 हजार 623 नव्या रुग्ण आढळून आले आहेत. तर, 197 मृत्युंची नोंद झाली आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या 4 लाख 9 हजार 651 वर पोहचली आहे. दरम्यान, देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती उपयोगी ठरणार आहे.