मुंबई : राज्यात आज 2285 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2237  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


पाच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,20, 772 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात बी ए.4 आणि 5 चे 73 तर बी ए. 2.75 चे 209  रुग्ण 


राज्यात बी ए.4 आणि 5 चे 73 तर बी ए.2.75 चे 209  रुग्ण आढळून आले आहेत.  ताज्या अहवालानुसार बी ए 2.75 या उपप्रकाराचे प्रमाण सध्या वाढताना दिसत असून बी ए 2.38 या  पूर्वी सर्वाधिक प्रमाणात असणाऱ्या उपप्रकाराचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. या  सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.4 आणि बीए.5 रुग्णांची संख्या 348 तर  बीए. 2.75 रुग्णांची संख्या 459 झाली आहे.


राज्यात एकूण 11,690 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 11690 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5712  इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 1659   सक्रिय रुग्ण आहेत. 


देशात 15 हजार 754 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus Cases Today)


गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या आठ हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र, या आठवड्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गुरुवारी 15 हजार 754 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्या आधी बुधवारी 12 हजार 608 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. एका दिवसात कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये तब्बल 3146 रुग्णांची वाढ झाली आहे. यासोबतच देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या देशात 1 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत.  देशातील सक्रिय रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे. आता देशात एकूण 1 लाख 1 हजार 830 कोरोना रुग्ण आहेत. तर गुरुवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 31 लाख 52 हजार 882 डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मता दर 3.47 टक्के, तर आठवड्याचा सकारात्मता दर 3.90 टक्के आहे. तसेच देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.58 टक्के आहे