मुंबई : राज्यात आज 1887 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2190 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


सहा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 


राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,30, 793 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात एकूण 12,269 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 


राज्यात एकूण 12,269 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5724  इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2407  सक्रिय रुग्ण आहेत. 


 मुंबईत गुरूवारी 838 रुग्णांची नोंद ( Mumbai corona cases)


आज मुंबईत 838 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गुरूवारी 1199 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,16,001 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,679 झाली आहे. सध्या मुंबईत 5724 रुग्ण आहेत. दरम्यान  रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 883 दिवसांवर गेला आहे.


देशात 10 हजार 725 नवे कोरोनाबाधित (Coronavirus Cases Today in India)


देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच बुधवारी दिवसभरात 10 हजार 725 रुग्णांची नोंद झाली असून 36 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याआधी मंगळवारी देशात 10 हजार 649 रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे रुग्णसंख्येत 76 रुग्णांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. दुसरीकडे पावसामुळे स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया यांसारखे साथीचे आजारही पसरताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासमोर नवीन आव्हानं उभी राहिली आहेत. देशात गेल्या 24 तासांत 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात नवीन 10 हजार 725 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 13,084 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत 4 कोटी 37 लाख 57 हजार 385 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.